
सौभाग्य काल खूप दिवसानंतर Avadhoot Gupte अवधूत दादा ची भेट झाली.. निमित्त होत मी बनवलेल्या गाण्याचं रेकॉर्डिंग. अतिशय निर्मळ प्रेमळ आणि अत्यंत प्रतिभाशाली व्यक्तिमत्व असलेला अवधूत दादा कधी सगळ्यांना आपलंस करून घेतो कळतच नाही. दादा तुझ्यासोबत घेतलेला हा रेकॉर्डिंग चा अनुभव म्हणजे अप्रतिम आणि मी शब्दात सांगू शकत नाही असाच होता. तुला स्टुडिओ #setup आणि #Acoustics खूप आवडलेत हे तू सांगितलस तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. केलेल्या मेहनतीची पावतीच मिळाली
दादा नेहमी असाच पाठीशी राहा
ज्याच्यामुळे मला हे गाणं बनवण्याची संधी मिळाली तो म्हणजे माझा अतिशय चांगला मित्र आणी आपला सगळ्यांचा लाडका Sagar Bhumkar सागर भाऊ भूमकर. तू माझ्यावर जो विश्वास ठेऊन मला हे काम सोपवलस त्याला नक्कीच मी जबाबदारीने पूर्ण करीनच, सदैव असाच पाठीशी रहा. आणि ज्यांच्यामुळे मला नेहमी इन्स्पिरेशन मिळत मोटिवेशन मिळत सदैव माझ्या पाठीशी असणारे श्री.जयेश काटकर सर Jayesh K आणि श्री. प्रदीप खांदवे सर Pradip Khandave ह्यांनी केलेल्या सहकार्याबाबत मी सदैव ऋणी आहे. लवकरच भेटूया ह्या नवीन आणि जबरदस्त गाण्यासोबत…
No comment